Feedback
दान
वेल्कोमे   लोगिन or   नई सदस्य पंजीकरण
अपनी भाषा चुनें:
 • ENGLISH
 • |
 • मराठी
 •  

       
  Name : Sushil Rapatwar |  Portfolio : President

   


  सुशील  Virgin Media मध्ये प्रकल्प व्यवस्थापक (Project Manager) आहे आणि तो त्याच्या बायको (रागसुधा) आणि मुली (काव्यझरी) सोबत लंडन मध्ये स्थायिक आहे. त्याने पुण्याच्या COEP मधून Instrumentation Engineering केल आहे आणि त्यानंतर Manchester Business School मधून MBA ही स्नातकोत्तर पदवी मिळवली. त्याने २००६-०७ सालापासून ४ वर्ष कार्यकारिणी समिती मध्ये वेग वेगळ्या स्तरावर काम केलं आहे. मंडळाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे त्याने व्यवस्थापन केले होते आणि मंडळाच्या sports club मध्ये देखील तो सक्रीय होता. सुशीलने २०१२-१४ ह्या कार्यकाळात अध्यक्षपदाचा भार यशस्वीपणे पार पाडला होता. पुन्हा एकदा हे कार्य स्वीकारतांना त्याला आनंद होत आहे.

   
       
  Name : Shardul Kulkarni |  Portfolio : Vice President
   
   
   
   
  शार्दुल फार्मसी क्षेत्रात Kings College London NHS Foundation Trust, Denmark Hill येथे Clinical Trials मध्ये कार्यरत आहे. तो त्याच्या बायको (शर्मिला) आणि  मुली (साची) सोबत लंडन मध्ये स्थाईक आहे. शार्दुल ने २०१० ते २०१४ पर्यंत २ कार्यकारिणी समित्यान मधून 'कार्यक्रम संचालक' म्हणून वेग-वेगळ्या स्तरावर सक्रियपणे काम केले आहे आणि यंदाच्या कार्यकारिणी मध्ये मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहताना त्याला अत्यंत आनंद होत आहे.
   
       
  Name : Dnyanesh Daudkhane |  Portfolio : Treasurer
     
   

  ज्ञानेश मुळचा पुण्याचा, २०१० पासून तो लंडन मध्ये राहत आहे. त्याने पुण्यातून B.Sc. Computer  science ची पदवी घेतली आणि त्यानंतर लंडन मधून M.Sc. Network Management ची पदवी पूर्ण केली. तो सध्या IT Consultant म्हणून कार्यरत आहे. लंडन मध्ये तो आणि पत्नि निमिषा ह्यारो मध्ये राहतात. ज्ञानेश विविध तालवाद्य वाजवतो. गेल्या ४ वर्षात त्याने महाराष्ट्र मंडळात अनेक कार्यक्रमात साथसंगत केली आहे. यामुळेच तो मंडळात सक्रिय कार्यकर्ता आहे. यंदाच्या कार्यकारणी समितीमध्ये खजिनदार पदावर कार्यरत राहताना त्याला खूप आनंद होत आहे. 

   
       
  Name : Ragasudha Vinjamuri Rapatwar |  Portfolio : PRO
     
   

  रागसुधा ही लंडन कॅम्पस मधल्या सनडरलंड विद्यापीठात अकेडेमिक शिक्षिका आहे. ती व्यावसायिक शास्त्रीय नृत्यांगना आणि शिक्षिका देखील आहे.  ती राष्ट्रकुल पत्रकार सभेची सभासद (Commonwealth Journalists Association) आहे आणि तिने लंडन आणि UK च्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक व्यासंगाचा बराच अभ्यास आणि लेखन केलं आहे. तिने २०१२-२०१४ सालच्या कार्यकारिणी समिती वर मीडिया आणि जनसंपर्क सचिव म्हणून काम केले आहे ज्याच्यात मंडळात होणार्या कार्यक्रमांची वेग-वेगळ्या माध्यमातून व्यापक स्वरूपात सतत मिडिया प्रसिद्धी केली. तिने ह्या कार्यकाळात लंडन महापौरांच्या कार्यालयात, भारतीय उच्च आयोगात, UK च्या पंतप्रधान कार्यालयात आणि संसदेत महाराष्ट्र मंडळ लंडन ची प्रतिमा/प्रोफाईल उंचावली.

   
       
  Name : Chetan Harpale |  Portfolio : Secretary
     
   
  चेतन ने Bombay Technical बोर्ड मधून औद्योगिक इलेक्ट्रोनिक्स मध्ये अभियांत्रिकी ची पदवी मिळवली. तो सध्या Johnson Controls Ltd. मध्ये Technical Services Manager म्हणून काम करतो. भारतातील आणि UK  मधल्या वेग-वेगळ्या क्षेत्रातल्या (औषधी, रसायने, शेती रसायने, तेल आणि वायू इत्यादी) कंपन्यांमध्ये Analytical Instruments चा त्याला २० वर्षांहून अधिक व्यावसायिक अनुभव आहे.  तो त्याची बायको (नेहा) आणि दोन मुलांबरोबर (ओम आणि ध्याना) लंडन मध्ये २००४ सालापासून स्थायिक आहे.
   
       
   Name : Nimisha Deshmukh Daudkhane |  Portfolio : Programme Coordinator
   

   

  मुंबई मध्ये जन्मलेली निमिषा तिच्या उच्च शिक्षणासाठी २०१२ साली लंडन ला आली. कार्यालयीन प्रशासन आणि विपणन (marketing) मध्ये तिला व्यावसायिक अनुभव आहे. अभ्यास चालू असताना ती मंडळात सक्रिय कार्यकर्ती होती. तिने ज्ञानेश दाउदखाने शी लग्न केले आणि आता ती Harrow, लंडन मध्ये स्थायिक आहे. तिने २०१४ च्या कार्यकारिणी समिती वर काम केले आहे. ह्या समितीत कार्यक्रम समन्वयक म्हणून काम करायला खूप आनंद होत आहे.

   
   
   
  Breitling Replica Replica Breitling Breitling Replica