Feedback
Donate
Welcome   Login or   New Member Registration

 

     
Name : Sushil Rapatwar |  Portfolio : President

 


सुशील  Virgin Media मध्ये प्रकल्प व्यवस्थापक (Project Manager) आहे आणि तो त्याच्या बायको (रागसुधा) आणि मुली (काव्यझरी) सोबत लंडन मध्ये स्थायिक आहे. त्याने पुण्याच्या COEP मधून Instrumentation Engineering केल आहे आणि त्यानंतर Manchester Business School मधून MBA ही स्नातकोत्तर पदवी मिळवली. त्याने २००६-०७ सालापासून ४ वर्ष कार्यकारिणी समिती मध्ये वेग वेगळ्या स्तरावर काम केलं आहे. मंडळाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे त्याने व्यवस्थापन केले होते आणि मंडळाच्या sports club मध्ये देखील तो सक्रीय होता. सुशीलने २०१२-१४ ह्या कार्यकाळात अध्यक्षपदाचा भार यशस्वीपणे पार पाडला होता. पुन्हा एकदा हे कार्य स्वीकारतांना त्याला आनंद होत आहे.

 
     
Name : Ajinkya Bhave |  Portfolio : Vice President
 
 
 
 
 
...
     
Name : Ragasudha Vinjamuri Rapatwar |  Portfolio : PRO
   
 

रागसुधा ही लंडन कॅम्पस मधल्या सनडरलंड विद्यापीठात अकेडेमिक शिक्षिका आहे. ती व्यावसायिक शास्त्रीय नृत्यांगना आणि शिक्षिका देखील आहे.  ती राष्ट्रकुल पत्रकार सभेची सभासद (Commonwealth Journalists Association) आहे आणि तिने लंडन आणि UK च्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक व्यासंगाचा बराच अभ्यास आणि लेखन केलं आहे. तिने २०१२-२०१४ सालच्या कार्यकारिणी समिती वर मीडिया आणि जनसंपर्क सचिव म्हणून काम केले आहे ज्याच्यात मंडळात होणार्या कार्यक्रमांची वेग-वेगळ्या माध्यमातून व्यापक स्वरूपात सतत मिडिया प्रसिद्धी केली. तिने ह्या कार्यकाळात लंडन महापौरांच्या कार्यालयात, भारतीय उच्च आयोगात, UK च्या पंतप्रधान कार्यालयात आणि संसदेत महाराष्ट्र मंडळ लंडन ची प्रतिमा/प्रोफाईल उंचावली.

 
     
Name : Chetan Harpale |  Portfolio : Secretary
   
 
चेतन ने Bombay Technical बोर्ड मधून औद्योगिक इलेक्ट्रोनिक्स मध्ये अभियांत्रिकी ची पदवी मिळवली. तो सध्या Johnson Controls Ltd. मध्ये Technical Services Manager म्हणून काम करतो. भारतातील आणि UK  मधल्या वेग-वेगळ्या क्षेत्रातल्या (औषधी, रसायने, शेती रसायने, तेल आणि वायू इत्यादी) कंपन्यांमध्ये Analytical Instruments चा त्याला २० वर्षांहून अधिक व्यावसायिक अनुभव आहे.  तो त्याची बायको (नेहा) आणि दोन मुलांबरोबर (ओम आणि ध्याना) लंडन मध्ये २००४ सालापासून स्थायिक आहे.