Feedback
दान
वेल्कोमे   लोगिन or   नई सदस्य पंजीकरण
अपनी भाषा चुनें:
 • ENGLISH
 • |
 • मराठी
 •  

  महाराष्ट्र मंडळ, लंडन हे भारताबाहेरील मराठी लोकांचे एक जुने मंडळ आहे. सन १९३२ मध्ये सुप्रसिद्ध लेखक आणि राजकारणी श्री न ची केळकर लंडनमध्ये गोलमेज परिषदेला आले होते. तेव्हा त्यांनी या मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या उद्घाटनाच्या चहापाण्यासाठी अनेक नामवंत लोक उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब्यारीस्तर जयकर, कोल्हापूरचे दिवान सुर्वे, डॉक्टर गोडबोले आणि डॉक्टर पारधी असे नामवंत लोक हजर होते. सुरुवातीला सेक्रेटरी म्हणून काम करणारे 'केसरी'चे श्री ताम्हणकर, पुढे मंडळाचे मुख्यातार बनले. 

   

  हळूहळू मंडळाची प्रगती चांगली होऊ लागली. अनेक कार्यकम सदर झाले. परंतु, दुसर्या महायुद्धाच्या दरम्यान मंडळाचे काम थंडावले. 

   

  १९५२ मध्ये मंडळामध्ये पुन्हा जीव फुंकला तो श्री बाळासाहेब खेर यांनी! त्या साली, श्री खेर यांची उच्चायुक्तपदी लंडनमध्ये नियुक्ती करण्यात आली. नव्या आणि जुन्या मराठी लोकांनी एकत्र येऊन मराठी गाण्याचे, नाटकांचे अनेक कार्यक्रम केले. दिवाळीच्या निमित्ताने फराळाचा आस्वाद घेतला. भारतातून कलाकारांना बोलावून त्याचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. आजवर मंडळामध्ये अनेक सुप्रसिद्ध लोक येऊन गेले आहेत. श्री पोद्दार, श्री सी डी देशमुख, श्री वी बी चव्हाण, श्री शरद पवार, आणि अलीकडे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमत्री श्री विलासराव देशमुख. 

   

  सुरुवातीची अनेक वर्षे मंडळाचे कार्यक्रम भाड्याने घेतलेल्या वास्तूत होत असत. मंडळाची आजची वास्तू १९८९ मध्ये ताब्यात घेतलेली आहे. एक चर्चची जागा उपलब्ध आहे असे समजले आणि लागलीच तेह्वाचे विश्वस्त आणि कार्यकारिणी यांनी पैसे उभारणीसाठी कंबर कसली. श्री आणि सौ  सहस्त्रबुद्धे, श्री आणि सौ प्रभू, श्री राम मराठे, श्री दिघे, श्री आणि सौ चौगुले आणि महाराष्ट्र राज्य यांकडून पैशाची भरपूर मदत झाली. मंडळाच्या सभासदांनीसुद्धा मोलाची मदत केली. त्यावेळी मंडळाला, प्रत्येक कुटुंबाकडून सरासरी १५० पौंड देणगी मिळाली. लोकांची मंडळाविषयी आस्था तेव्हापासून आहे! अशाप्रकारे, ७२,००० पौंड देऊन, ९९ वर्षाच्या करारावर मंडळाची स्वताची वास्तू उभी राहिली. 

   

  स्वताची वास्तू असल्याने मंडळाच्या कार्यामांना जोर तर आलाच आणि त्यांची संख्याही वाढली. आज, मंडळ वर्षभरात जवळपास १०-१२ विविध कार्यक्रम आयोजित करते. त्याच बरोबर, लहान मुलांसाठी वार्षिक खेळांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वृद्ध, महिला यांना जमण्यासाठी मंडळाच्या वास्तूचा फारच उपयोग होतो. या वास्तूत, शास्त्रीय संगीत, नाटक, नृत्य आदी कलांचे सादरीकरण झाले आहे. अनेक नामवंत कवी, लेखक यांची भाषणे झाली. आणि सर्वात महत्वाचा वार्षिक कार्यक्रम म्हणजे- श्री गणेशोत्सव'. या १० दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. लंडनच्या आणि लंडन बाहेरूनही असंख्य लोक गणरायाचे दर्शन घेण्यासाठी ...या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून येतात. मंडळाच्या कार्याकार्तांचा उत्साह देखील ओतप्रोत वाहत असतो. श्री गणेशोत्सव हा मंडळाचा नक्कीच मानाचा कार्यक्रम आहे.

   

  महाराष्ट्र मंडळाद्वारे, महाराष्ट्रापासून दूर असलेल्या लोकांना एकत्र येऊन गप्पा मारण्याचे, कला-संस्कृती यांचा आस्वाद घेण्याचे, आपले सण साजरे करण्याचे एक व्यासपीठ मिळाले आहे. मंडळाच्या समस्त सभासदांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा अशीच मंडळाच्या विश्वस्त आणि कार्यकारिणीची इच्छा राहिली आहे. लोकांना मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सादर कार्यासाठी मंडळ सतत कार्यशील राहिले आहे. 'महाराष्ट्र भवन' या मंडळाच्या वास्तूमध्ये महाराष्ट्र निर्माण करण्याचे मंडळाचे सतत प्रयत्न राहिले आहेत.

   

  Breitling Replica Replica Breitling Breitling Replica